Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कराडला मोठा धक्का बसला आहे. त्याशिवाय काल वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते.
खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा आहे असे बोललं जात आहे. हा व्हिडिओ समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ समोर येताच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी CID अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“सीआयडीचे बीडला जे ऑफिस आहे तिथे माहितीसाठी लोक येत होते, तिथे बालाजी तांदळे (Balaji Tandale) नावाचा माजी सरपंच आला होता. त्याने आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्याने आम्हाला आरोपीचे फोटो दाखवले. घटनेदिवशी माझ्या भावाच्या मागे जी गाडी होती, ती त्याच्या घरासमोर उभी होती. आणि आता परत तो त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे त्याची कसून चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
Dhananjay Deshmukh on Balaji Tandale
धनंजय देशमुख यांच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांनी नाव घेतलेला बालाजी तांदळे कोण आहे? त्याचा हत्येशी कसा संबंध आहे? अशी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच धनंजय देशमुख यांची मागणी सरकार मान्य करणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :