Share

सुट्टीतही ‘समर’ची ड्युटी! स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर नेमकं काय करतोय सुबोध भावे?

सुबोध भावे सुट्ट्यांसाठी स्वित्झर्लंडमध्ये असले तरी त्यांनी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचं शूटिंग थांबवलेलं नाही, त्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Published On: 

Subodh Bhave shooting a video on the streets of Switzerland

🕒 1 min read

सुट्टीत फिरायला गेल्यावर ऑफिसचं काम आठवलं तर कोणालाही चिडचिड होईल, हो ना? पण मराठी मनोरंजन विश्वातील एका सुपरस्टारने चक्क परदेशातील सुट्टीतही आपलं शूटिंग सुरूच ठेवलं आहे.

आपण बोलतोय ते प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्याबद्दल. सध्या सुबोध त्यांची पत्नी आणि मुलांसोबत स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. पण इकडे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghantli Hi Tutena) या त्यांच्या गाजत असलेल्या मालिकेचं काय? सुबोध यांनी यावर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे.

Subodh Bhave Switzerland Video

सुबोध यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते चक्क स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर मालिकेचा सीन शूट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही मोठ्या क्रूची गरज लागली नाही.

त्यांचा मोठा मुलगा कान्हा कॅमेरामन झाला असून धाकटा मल्हार समोरच्या पात्राचे डायलॉग्स बोलून दाखवत आहे. “मी समरची मिशी घेऊनच फिरतोय. जागा बघून सीन शूट करतो आणि पाठवून देतो”, असं सुबोध यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

तसेच त्यांनी पत्नी आणि मालिकेची निर्माती मंजिरी हिचेही आभार मानले आहेत. सुबोध यांच्या या कामावरील निष्ठेचं सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत असून, चाहते ‘सलाम.. शो मस्ट गो ऑन’ अशा कमेंट्स करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही