Share

झापूक झुपूक सुरज चव्हाण आता ‘इंडियन जस्टिन बीबर’? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सूरज चव्हाणला ‘इंडियन जस्टिन बीबर’ आणि ‘Most Handsome Man’ म्हटलं जातंय? या व्हायरल दाव्यांमागचं सत्य समोर, वाचा सविस्तर रिपोर्ट.

Published On: 

Suraj Chavan Viral News: 'इंडियन जस्टिन बीबर'? व्हायरल सत्य समोर!

बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आणि सूरज चव्हाणचं (Suraj Chavan) नशीबच पालटलं, पण आता जी चर्चा सुरू आहे ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल! चक्क आपल्या मातीतल्या सूरजला परदेशातल्या ‘जस्टिन बीबर’ची (Justin Bieber) उपमा दिली जातेय, हे खरंय का? सोशल मीडियावर सध्या सूरजचे फोटो आणि बीबरचे जुने फोटो कोलाज करून एकच धुमाकूळ घातला जातोय. नेटकरीही चक्रावलेत की आपला ‘गुलीगत किंग’ नक्की हिरो आहे की पॉप स्टार?

‘झापूक झुपूक’ स्टाईलने अख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सूरज आता ग्लोबल झालाय की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. व्हायरल होणाऱ्या पोस्ट्समध्ये दावा केला जातोय की, सूरजची सडपातळ शरीरयष्टी आणि २०१० मधली त्याची हेअरस्टाईल हुबेहूब जस्टिन बीबरसारखी दिसते. परदेशी सोशल मीडिया साईट्सवरही सूरजला ‘भारताचा जस्टिन बीबर’ म्हणत गौरवण्यात आलंय. या कंपॅरिजनमुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.

Suraj Chavan Viral News

दुसरीकडे, सूरजला ‘Most Handsome Man’ चा किताब मिळाल्याच्या बातम्याही वाऱ्यासारख्या पसरल्या. हे सगळं खरं मानण्याआधी सत्य जाणून घ्या. एक्स (Twitter) वरील कम्युनिटी नोट्स आणि फॅक्ट चेकनुसार, हा दावा संपूर्णपणे खोटा (Fake) आहे. जगात किंवा भारतात ‘सर्वात हँडसम मॅन’ ठरवण्यासाठी कोणतीही अधिकृत सरकारी यंत्रणा किंवा वोटिंग सिस्टीम अस्तित्वात नाही. त्यामुळे सूरजला असा कोणताही अधिकृत किताब मिळालेला नाही, ही केवळ एक सोशल मीडिया अफवा आहे.

बारामतीच्या मोढवा गावातून आलेला हा पठ्ठ्या आपल्या अस्सल गावरान अंदाजाने लोकांच्या मनावर राज्य करतोय हे मात्र नक्की. ‘बुक्किट टेंगुल’ म्हणत त्याने गरिबीवर मात केली आणि आज तो २.९ मिलियन लोकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. बीबर असो वा नसो, सूरजचा ‘गुलिगत’ स्वॅग मात्र भारीच आहे!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही