Share

‘साहेब मी आईला संपवलंय…’, अमरावतीत अविवाहित आयटी इंजिनिअर मुलाने केला आईचा खून

अमरावतीमध्ये किरकोळ वादातून एका ३९ वर्षीय आयटी इंजिनिअर मुलाने आपल्या आईचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Published On: 

Amravati murder IT engineer arrested for killing mother

अमरावती, 12 ऑक्टोबर: अमरावतीमध्ये एका ३९ वर्षीय आयटी इंजिनिअरने स्वतःच्या ६० वर्षीय आईचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर हा मुलगा मृतदेहाजवळच बसून होता. त्यानंतर त्याने स्वतः गाडगे नगर पोलीस ठाण्यात (Amravati Crime) जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

रंजना कानफाडे असे मृत महिलेचे नाव आहे, तर तुषार सतीश कानफाडे असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तुषार हा अविवाहित असून तो एका आयटी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे तो अमरावतीतूनच काम करत होता. या घरात केवळ आई आणि मुलगा असे दोघेच राहत होते.

गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी रिंग रोडवरील गजानन प्लाझा परिसरात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात तुषारने आईचा गळा आवळला, ज्यामध्ये रंजना यांचा मृत्यू झाला. आईला संपवल्यानंतर तुषार तिथेच बसून राहिला होता.

काही वेळाने तुषारने पोलीस ठाणे गाठून ‘मी माझ्या आईचा खून केला’, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. गाडगे नगर पोलिसांनी तुषारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मात्र, त्यांच्यातील वादाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही