Share

कोल्हापुरात लोहगड हत्याकांडाची पुनरावृत्ती; लग्न मोडल्याच्या रागातून इंजिनिअर प्रेयसीला २५० फूट खोल दरीत ढकलले

पुण्यात नुकतीच सिया गोयल या तरुणीने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने होणारा पती केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून दिल्याची घटना घडली होती.

Published On: 

Kolhapur crime boyfriend killed girlfriend by pushing into valley

कोल्हापूर, 12 ऑक्टोबर: पुण्यात नुकतीच सिया गोयल या तरुणीने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने होणारा पती केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून दिल्याची घटना घडली होती. या हत्याकांडाची आठवण ताजी करणारी अत्यंत क्रूर घटना आता कोल्हापुरात उघडकीस आली आहे. श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. अवधूत कॉलनी, गारगोटी) या तरुणाने आपल्या इंजिनिअर प्रेयसीची अडीचशे फूट खोल दरीत ढकलून निर्घृण हत्या (Kolhapur Crime) केली आहे. भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित आरोपी श्रीपादला ताब्यात घेतले आहे.

तरन्नूम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. गारगोटी गावात एकमेकांच्या घरासमोर राहणाऱ्या श्रीपाद आणि तरन्नूम यांची जुनी ओळख होती. या ओळखीतून गेल्या साडेपाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी तरन्नूमचा विवाह दुसरीकडे ठरल्याने तिने श्रीपादला भेटणे टाळण्यास सुरुवात केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास श्रीपादने गोड बोलून तरन्नूमला नाईकवाडी येथील कड्यावर फिरण्यासाठी नेले. तेथे गेल्यानंतर, ‘आपलं लग्न ठरल्यामुळे आता यापुढे प्रेमसंबंध ठेवता येणार नाही,’ असे तिने त्याला स्पष्टपणे सांगितले. यावरून संतापलेल्या श्रीपादने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिला थेट अडीचशे फूट खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर त्याने थेट भुदरगड पोलीस ठाणे गाठले आणि आपण पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गेलो असता तरन्नूम बेपत्ता झाल्याचा बनाव रचला.

श्रीपादने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, कसून चौकशी करताना पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. प्रश्नांची सरबत्ती होताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. शुक्रवारी रात्री उशीर आणि काळोख झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी आंबोली येथील बचाव पथकाने मोहीम सुरू केली. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोरीच्या साहाय्याने तरन्नूमचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. विच्छेदनासाठी मृतदेह कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही