Share

‘छावा’ फेम अक्षय खन्नाला मीच ॲक्टिंग शिकवली! प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ

अभिनेता अनुप सोनीने एका मुलाखतीत आपणच अक्षय खन्नाला अभिनय शिकवल्याचा दावा केला असून सध्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Published On: 

Anup Soni claims he taught acting to superstar Akshaye Khanna

Akshaye Khanna | ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ या सिनेमांमधून अक्षय खन्नाने आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने ‘मीच अक्षय खन्नाला ॲक्टिंग शिकवली’ असा मोठा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यंतरी अक्षयने ‘दृश्यम ३’ सिनेमा सोडल्याची बातमी आली आणि त्याला पैशांचा माज आल्याची चर्चा रंगली. आता तो १९ मार्चला ‘धुरंधर: द रिवेंज’ मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पण ज्या अभिनेत्यावर आज संपूर्ण देश फिदा आहे, त्याला आपणच अभिनयाचे धडे दिल्याचे ‘अपहरण’ आणि ‘सत्यमेव जयते २’ फेम अनुप सोनी याने म्हटले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने हा दावा केला.

Anup Soni claims he taught acting to Akshaye Khanna

“मी अक्षयसोबत अनेक अभिनय वर्ग घेतले आहेत. मीच त्याला अभिनय शिकवलाय आणि आज त्याचा यशस्वी प्रवास पाहून मला मनापासून आनंद होतोय,” असा मोठा गौप्यस्फोट अनुप सोनीने केला आहे.

अक्षयची विचारसरणी नेहमीच स्पष्ट होती आणि कोणत्याही भूमिकेत तो चपखल बसतो, असेही त्याने पुढे सांगितले. आज तो निर्मात्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह अभिनेता बनला असल्याचेही अनुप म्हणाला.

दुसरीकडे, Akshaye Khanna लवकरच सनी देओलसोबत नेटफ्लिक्सच्या ‘इक्का’ सिनेमात आणि ‘महाकाली’ या साऊथ चित्रपटातही झळकणार आहे. त्यामुळेच आता अनुप सोनीच्या या दाव्यावर अक्षय काही प्रतिक्रिया देतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही