Share

‘सरकार कुणाला फसवतंय?’ Gas Shortage वरून केंद्रावर थेट हल्लाबोल!

देशातील Gas Shortage वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गॅस उत्पादन वाढल्याचे सरकारी दावे खोटे असून जनतेची फसवणूक सुरू असल्याचा आरोप झालाय.

Published On: 

Gas Shortage people waiting in queue outside gas agency

Gas Shortage: राजकारणात आणि सरकारी दाव्यांमध्ये किती तफावत असते, हे पुन्हा एकदा समोर आलंय. देशात एकीकडे गॅस सिलिंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे सरकार मात्र सगळं आलबेल असल्याचा दावा करतंय.

देशात सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून थेट केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

Gas Shortage मुळे सर्वसामान्यांचे हाल

इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे आखाती देशांमधून येणाऱ्या गॅस पुरवठ्याला मोठा फटका बसलाय. असं असलं तरी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी देशात गॅसची कोणतीही कमतरता नसून उत्पादन २८ टक्क्यांनी वाढल्याचा दावा संसदेत केला होता.

यावर “सरकारच्या भंपक दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या प्रचंड रांगा सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करण्यास पुरेशा आहेत. मग सरकार नेमके कुणाला फसवत आहे?” असा थेट सवाल ‘सामना’ अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

दुसरीकडे, आर्थिक राजधानी मुंबईत Gas Shortage मुळे तब्बल ३० टक्क्यांहून अधिक हॉटेल्सनी व्यवसायाला टाळे ठोकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरातही विद्यार्थ्यांच्या खाणावळींमधून पोळी-भाजी गायब झाली आहे. गॅस मिळेपर्यंत वरण-भातावर समाधान मानण्याचे मेसेज विद्यार्थ्यांना येऊ लागले आहेत.

या भीषण टंचाईचा फटका फक्त शहरांनाच नाही, तर कोकणातील गणपतीपुळे आणि महाराष्ट्राचे भूषण असलेल्या पैठणच्या नाथषष्ठी यात्रेलाही बसलाय. गॅस नसल्याने अनेक दिंड्यांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरावं लागल्याचा दावा करण्यात आलाय. लग्नसराईत केटरिंग व्यावसायिकांचेही कंबरडे मोडले आहे.

जर देशात खरोखरच पुरेसा गॅस साठा आहे, तर मग बुकिंगचे नियम का बदलले? शहरात २१ ऐवजी २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवसांनी गॅस बुकिंगचा नवीन नियम सरकारने आणलाय. त्यामुळेच सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा विरोधाभास असल्याचं स्पष्ट होतंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही