Share

सूर्यकुमार यादवची मोठी खेळी! IND vs NZ Final च्या ‘प्लेईंग ११’ मधून २ स्टार खेळाडूंचा पत्ता कट?

रविवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता असून दोन स्टार खेळाडूंना डच्चू मिळू शकतो

Published On: 

ind vs nz

🕒 1 min read

IND vs NZ Final | टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यापासून टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे, पण त्याआधीच भारतीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IND vs NZ Final चा महासंग्राम रंगणार आहे. पण या सर्वात महत्त्वाच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर आपल्या ‘विनिंग कॉम्बिनेशन’ला धक्का लावणार का? हा प्रश्न सध्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांना सतावतोय.

इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी, संघातील काही त्रुटी लपून राहिलेल्या नाहीत. विशेषतः मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती इंग्लंडविरुद्ध खूपच महागडा ठरला होता. त्याने आपल्या स्पेलमध्ये तब्बल 64 धावा लुटवल्या होत्या.

IND vs NZ World Cup Final 2026

दुसरीकडे युवा सलामीवीर अभिषेक शर्मा या संपूर्ण विश्वचषकात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे फायनलसारख्या दबावाच्या सामन्यात या दोघांवर पुन्हा विश्वास ठेवणं टीम इंडियाला महागात पडू शकतं.

सूत्रांनुसार, कर्णधार सूर्यकुमार यादवने फायनलसाठी एक भक्कम प्लॅन तयार केला आहे. वरुण चक्रवर्तीच्या जागी अनुभवी कुलदीप यादवला थेट प्लेईंग ११ मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अहमदाबादची खेळपट्टी आणि न्यूझीलंडचे आक्रमक फलंदाज पाहता, कुलदीपची फिरकी भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकते.

तसेच फलंदाजीला आणखी बळकटी देण्यासाठी अभिषेक शर्माला बाहेर बसवून ‘फिनिशर’ रिंकू सिंगला संघात आणले जाऊ शकते. असे झाल्यास तुफान फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनसोबत ईशान किशन सलामीला येऊ शकतो.

न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. आता रविवारी टॉसच्या वेळी सूर्या आणि गंभीर कोणता धाडसी निर्णय घेतात, याकडेच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. क्रिकेटचं वातावरण आता चांगलंच तापलं आहे!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!