Share

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांची स्पष्ट भूमिका: ‘आमचा तुकाराम मुंढेंवर विश्वास, पण सरकारवर नाही’

पुण्यातील एमपीएससी आंदोलनात विवेकानंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पेपरफुटीचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन करत आपला विश्वास सरकारवर नसून तुकाराम मुंढेंवर असल्याचे स्पष्ट केले.

Published On: 

MPSC students protest in Pune mentioning Tukaram Mundhe

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: पुण्यात एस. एम. जोशी पुलाखाली गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून (MPSC Protest) एक महत्त्वपूर्ण भूमिका समोर आली आहे. “आमचा विश्वास प्रशासक तुकाराम मुंढे यांच्यावर आहे, पण सरकारवर अजिबात नाही,” असे स्पष्ट मत या आंदोलनादरम्यान चर्चेत आलेले विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या विवेकानंद पाटील यांची आक्रमक भाषणशैली आणि वक्तृत्व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेत आहे.

पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेवर बोट ठेवत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साद घातली. आपल्या भाषणात ते म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार असाल आणि पेपरफुटी बाहेर काढणार असाल, तर आम्ही सर्व विद्यार्थी तुमचे कौतुक करून तुमच्या पाठीशी उभे राहू.”

गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे पाटील यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, “ज्यांनी ज्यांनी आमच्या आंदोलनावरती टीका केली, त्यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. हा आमचा नैतिक विजय आहे,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही