नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: जंतर मंतर येथे ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेले अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्या आजीचे निधन झाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी ही दुःखद बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप सीजेपीने केला होता. या वादावर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेत एक व्हिडीओ समोर आणला असून हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
डीसीपी आणि जनसंपर्क अधिकारी नेहा यादव यांनी सांगितले की, पोलिसांना मृत्यूची माहिती मिळताच ती तत्काळ अभिजीत दिपकेंना देण्यात आली. तसेच, त्यांना विमान प्रवासाची सोय आणि फोन कॉल्ससह सर्व शक्य ती मदत देण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. पत्रकार परिषदेत दाखवलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी दिपकेंना आजीच्या निधनाची माहिती देताना स्पष्ट दिसत आहेत. मात्र, त्यादरम्यान दीपके “मला अटक करा” असे म्हणताना ऐकू येत असून, त्यांनी स्वतःच्या वडिलांचा फोन नंबर देण्यास आणि त्यांच्याशी बोलण्यासही नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटकेचे कारण स्पष्ट करताना नेहा यादव म्हणाल्या की, या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती. यापूर्वीच्या आंदोलनात दिलेल्या हमींचे पालन न करता हिंसाचार, जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून नवी दिल्लीत कलम १६३ बीएनएस लागू करण्यात आले. याच कारणामुळे अभिजीत यांच्यासह सौरभ आणि आशुतोष यांना ताब्यात घेण्यात आले होते.
दरम्यान, अभिजीत दिपकेंनी पोलिसांचे हे दावे फेटाळले आहेत. “साडेतीन वाजता पोलिसांनी माझ्या आई-वडिलांना फोन लावून दिला आणि मला अटक झाल्याचे सांगायला लावले. आजी वारली असतानाही मला घरच्यांशी बोलू दिले नाही, हा केवळ भीती निर्माण करण्याचा प्रकार होता,” असा आरोप त्यांनी केला. दुपारी भावाशी बोलण्यासाठी नंबर पाहण्याकरिता स्वतःचा मोबाईल मागितला असता, पोलिसांनी तो दोन मिनिटांसाठीही दिला नाही, असा दावा दीपके यांनी केला आहे. अटकेच्या वेळी वकिलाला हजर ठेवण्याच्या कायदेशीर नियमाचेही उल्लंघन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तो सज्जन माणूस नव्हता…’, नाना पाटेकर यांच्याबद्दल तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान
- दिल्लीत सीजेपीचा एल्गार: ‘आम्ही मागे हटणार नाही, मोदी-शहांकडूनच शांतता भंग’, नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
- नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाली, ‘तो अत्यंत अहंकारी माणूस होता…’
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









