प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: बॉलिवूडमधील #MeToo मोहिमेदरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्रीने केलेल्या खळबळजनक विधानांमुळे सध्या सर्वत्र मोठी चर्चा सुरू झाली आहे.
लखनऊ येथे आयोजित एका कार्यक्रमात तनुश्री (Tanushree Dutta) उपस्थित होती. सुरुवातीला तिने नाना पाटेकर यांच्याविषयी बोलण्यास नकार दिला होता. मात्र, तिच्या जुन्या आरोपांबाबत विचारणा झाल्यावर तिने आपली भूमिका स्पष्ट केली. “मी माझ्या आरोपांवर १०० टक्के ठाम असून, त्यांचा दहा वेळा पुनर्जन्म झाला तरी माझे आरोप तेच राहतील. सत्य ते सत्यच राहणार आहे आणि मी जे काही सहन केलंय ते मी सांगूही शकत नाही,” असे तनुश्री म्हणाली.
नाना पाटेकर यांच्यावर टीका करताना तनुश्रीने त्यांच्या कुटुंबाबाबतही धक्कादायक दावा केला. “एका महिलेच्या विरोधात तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने लोकांना उभं करता. तो काही चांगला माणूस नव्हता. तो मन्या सुर्वेच्या, एका गँगस्टरच्या कुटुंबातला होता, तो सज्जन माणूस नव्हता,” असे तिने म्हटले आहे.
गेल्या ५ ते ७ वर्षांत आलेल्या अनुभवांवरून आपण स्वतःला कधीच सुरक्षित मानले नसल्याचे तनुश्रीने सांगितले. ती म्हणाली, “प्रत्येकाचा शेवट हा असतोच. गेल्या काही दिवसांपासून मी सतत प्रार्थना करत होते. सुरक्षित वाटत नसल्यामुळे मुंबई सोडून एका मंदिराच्या गावात स्थायिक होण्याचा माझा विचार सुरू होता.”
२०१८ पासून घडलेल्या घटनांचे डाग कधीच पुसता येणार नाहीत, असे सांगून तनुश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या. “मला माहिती नाही, पण एक वाईट व्यक्ती मरण पावली आहे. तुमचा द्वेष करणारी एक व्यक्ती मरण पावलीय. पण घडलेली कोणतीच गोष्ट विसरली जाऊ शकत नाही,” असे सांगत तनुश्रीने आपला जुना संताप पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’मुळे धोंदलगाव टँकरमुक्त; गावकऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा
- बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित राडा; दोन गटात तुफान हाणामारी, लोखंडी रॉडने फोडली डोकी
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









