लखनौ, 11 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशभरासह मनोरंजन आणि राजकीय विश्वात शोककळा पसरली असतानाच, त्यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मात्र तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘तो (Nana Patekar) अत्यंत अहंकारी माणूस होता, त्यामुळे देवानेच त्याचा जीव घेतला’, अशी धक्कादायक प्रतिक्रिया तिने नानांच्या निधनानंतर दिली आहे.
लखनौ येथे आयोजित स्निग्धा आणि शिराज यांच्या एका कार्यक्रमात तनुश्री सहभागी झाली होती. सुरुवातीला तिने या निधनावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. आजचा दिवस केवळ आयोजकांसाठी असून, ‘जे होऊन गेले ते होऊन गेले’ असे ती म्हणाली होती. मात्र, त्यानंतर नाना पाटेकर यांच्यावरील जुन्या आरोपांबाबत विचारणा झाल्यावर तिने सर्व मर्यादा ओलांडत आक्रमक भूमिका घेतली.
आपल्या जुन्या दाव्यांवर आपण आजही शंभर टक्के ठाम असल्याचे तनुश्रीने स्पष्ट केले. नानांचा दहा वेळा पुनर्जन्म झाला तरी सत्य बदलणार नाही, असे ती म्हणाली. न्यायव्यवस्थेवर बोट ठेवत तिने गंभीर आरोप केले की, तिच्या मुख्य साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर झाले होते. ज्या दिवशी हा साक्षीदार साक्ष देणार होता आणि खटल्याचा निकाल तिच्या बाजूने लागण्याची शक्यता होती, नेमक्या त्याच दिवशी न्यायाधीशांनी चलाखी करून हे प्रकरण रद्द केले.
नाना पाटेकर यांच्या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि एकापाठोपाठ एक निर्माण केलेल्या संकटांमुळे आपण आजारी पडलो होतो, असे ती म्हणाली. नाना हे कुणी सज्जन व्यक्ती नसून ते गँगस्टर मान्या सुर्वे याच्या कुटुंबातील होते, असा खळबळजनक दावाही तनुश्रीने या वेळी केला.
नानांचा उल्लेख ‘इव्हिल डेड’ असा करताना तिने स्वत:च्या छळाचा पाढा वाचला. खटला मागे घेण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव आणला गेला तसेच विविध आमिषेही दाखवली गेली. एवढेच नाही तर, तिच्या गाडीच्या ब्रेकच्या तारा कापून तिला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही तिने केला. त्यामुळे ज्यांचे नानांसोबत चांगले संबंध होते त्यांना ते कसेही वाटत असले तरी, एका पीडितेच्या दृष्टिकोनातून ते नक्कीच ‘इव्हिल डेड’ आहेत, असा पुनरुच्चार तनुश्री दत्तानं केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकरांच्या ‘नाम फाऊंडेशन’मुळे धोंदलगाव टँकरमुक्त; गावकऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा
- बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित राडा; दोन गटात तुफान हाणामारी, लोखंडी रॉडने फोडली डोकी
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









