अमरावती, 11 ऑक्टोबर: राज्यात सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार अशी कारवाई झालेल्या नेत्यांची नावे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही या तिघांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रताप अडसड यांनी या तिघांवर कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले आहे.
राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मिळून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक, अमरावती शिक्षक, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते.
अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सुटली असून, विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी तीनही बंडखोर नेते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोरील टेन्शन आणि आव्हान अद्यापही कायम आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आता महाराष्ट्र बंद होणार! शिवसेना भवनाबाहेर राडा, आदित्य, अमित आणि तेजस ठाकरे आक्रमक
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; कंगना राणौत म्हणाल्या, ‘हे तर देशद्रोही’
- राजकारण्यांनी वयाच्या साठीनंतर निवृत्त व्हावे, वेड्यासारखे वागू नये; इंदुरीकर महाराजांच्या विधानाची तुफान चर्चा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









