‘मी बिकिनी घालेल, कोणाच्या बापाचं काय…’; ‘महादेव’ फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया ट्रोलर्सवर भडकली

‘देवों के देव… महादेव’ या लोकप्रिय मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया सध्या तिच्या एका सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Published On: 

Sonarika Bhadoria slams trolls for comments on her bikini photos.

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: ‘देवों के देव… महादेव’ या लोकप्रिय मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया सध्या तिच्या एका सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर बिकिनीत फोटो पोस्ट केल्याने तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर आता तिने (Sonarika Bhadoria) एका पॉडकास्टमध्ये संताप व्यक्त करत, ‘मी बिकिनी घालेल, कोणाच्या बापाचं काय जातं’, असे सुनावले आहे.

अध्यात्मिक मालिकेत पार्वतीची भूमिका साकारल्याने प्रेक्षकांशी तिचे एक वेगळे नाते जोडले गेले होते. त्यामुळे तिने स्वतःचे बिकिनीतील फोटो शेअर केल्यावर अनेकांनी तिला ‘असंस्कारी’ आणि ‘बेशर्म’ म्हणत तिच्यावर अश्लील कमेंट्स केल्या. ‘पार्वती बिकिनी कशी काय घालू शकते?’ असा प्रश्न विचारत तिला लक्ष्य करण्यात आले. महादेव मालिकेनंतर इतर अनेक मालिकांमध्ये काम करूनही तिला या गोष्टीवरून ट्रोल करण्यात आले होते.

यावर स्पष्टीकरण देताना सोनारिका म्हणाली, “माझ्या वडिलांना आणि नवऱ्याला याने काहीच फरक पडत नाही. त्यामुळे बिकिनी घालण्यात मला कसलीही हरकत नाही. मी मालिकेत फक्त एक भूमिका साकारली होती. पण मी कोणते कपडे घालते, ते मला स्वतःला प्रेझेंट करतात. जर तुम्हाला पाण्यात जायचे असेल, तर सूट किंवा ड्रेस घालून नाही, तर बिकिनी घालूनच जाल.”

ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना ती पुढे म्हणाली की, हे असे लोक असतात जे दुसऱ्यांच्या आयुष्यावर जळतात. पार्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण आभारी आहोत, पण आपले एक खासगी आयुष्यही आहे हे लोकांनी समजून घ्यायला हवे, असेही तिने स्पष्ट केले. सोनारिका सध्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि ती आपला पती व मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही