Chhatro Ki Gunj: पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या यशानंतर काँग्रेसचा उत्साह वाढलाय हे नक्की. पण, हाच उत्साह आता सोशल मीडियावर चर्चेचा आणि काहीसा विनोदाचा विषय ठरतोय. कारण काँग्रेसने नुकतंच शेअर केलेलं एक भन्नाट पोस्टर!
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यानंतर, महाराष्ट्र काँग्रेसने ‘पुढची छात्रों की गूंज महाराष्ट्रात कुठे व्हायला हवी?’ असा सवाल करत एक ग्राफिक्स शेअर केलं. यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर असे चार पर्याय देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरच्या जागी पुण्याचा ‘शनिवारवाडा’!
तुम्ही म्हणाल यात विशेष काय? तर पोस्टर बारकाईने पाहिल्यावर खरी गोम लक्षात येते. चौथ्या क्रमांकावर असलेल्या ‘छत्रपती संभाजीनगर’च्या नावासमोर चक्क पुण्याच्या ऐतिहासिक ‘शनिवारवाड्याचा’ फोटो छापण्यात आला आहे!
छत्रपती संभाजीनगर हे ५२ दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं. इथं बीबी का मकबरा, देवगिरीचा किल्ला अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तरीही काँग्रेसकडून थेट पुण्याची वास्तू वापरली गेल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दुसरीकडे, नाशिकच्या नावासमोर वापरलेला फोटोही महाराष्ट्रातील नसून उत्तर प्रदेशातील काशीच्या (वाराणसी) घाटांसारखा दिसत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
थोडक्यात सांगायचं तर, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेत, भूगोलाचा आणि इतिहासाचा मात्र चांगलाच गोंधळ उडालेला दिसतोय. याबाबत अद्याप काँग्रेसच्या अधिकृत सूत्रांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- रुपाली चाकणकरांचा ओटीटीवर दबाव, मानसिक छळ; दिपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट
- MPSC पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; फेरपरीक्षेची केली मागणी
- रक्षाबंधनाला भावासाठी राखी घेताय? बाजारातील ‘ही’ चूक टाळा, शास्त्र काय सांगतंय पाहा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











