Share

पुण्याचा शनिवारवाडा थेट संभाजीनगरमध्ये? काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टरवरून सोशल मीडियावर जोरदार खिल्ली

महाराष्ट्र काँग्रेसने ‘छात्रों की गूंज’ च्या नव्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली पुण्याचा शनिवारवाडा दाखवल्याने खळबळ उडाली. फजितीनंतर काँग्रेसने सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली आहे.

Published On: 

Congress Chhatro Ki Gunj Poster Blunder showing Shaniwar Wada instead of Chhatrapati Sambhajinagar

Chhatro Ki Gunj: पुण्याचा ऐतिहासिक शनिवारवाडा आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलाय, तर तुमचा विश्वास बसेल? अर्थातच नाही! पण महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचा यावर पूर्ण विश्वास असल्याचं दिसतंय.

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पुण्यात नुकतंच मोठं यश मिळालं. त्यानंतर ‘पुढची गूंज कुठे?’ असा सवाल करत काँग्रेसने एक ग्राफिक पोस्टर शेअर केलं. पण याच एका पोस्टरने आता काँग्रेसची मोठी राजकीय फजिती केली आहे.

Congress Chhatro Ki Gunj Poster Blunder:

५२ दरवाजांच्या शहरात लावला पुण्याचा शनिवारवाडा!

या पोस्टरमध्ये मुंबई, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर असे चार पर्याय देण्यात आले होते. पण खरी गोम इथेच होती. डिझायनरने छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली चक्क पुण्याच्या शनिवारवाड्याचा फोटो छापला! एवढंच नाही, तर नाशिकच्या जागी थेट उत्तर प्रदेशातील काशीचे घाट दाखवल्याचीही चर्चा रंगली.

५२ दरवाजांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा, देवगिरीचा किल्ला अशा अनेक वास्तू आहेत. तरीही भूगोलाचा आणि इतिहासाचा असा भयंकर गोंधळ उडाल्याने नेटकऱ्यांनी काँग्रेसला सोशल मीडियावर चांगलंच धारेवर धरलं.

अखेर जोरदार ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर काँग्रेसला आपली मोठी चूक लक्षात आली. त्यांनी तातडीने ते जुनं ट्विट डिलीट करून टाकलं आहे. तसेच, आता छत्रपती संभाजीनगरच्या नावासमोर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या’ (BAMU) गेटचा फोटो लावून त्यांनी नवं दुरुस्त केलेलं पोस्टर शेअर केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही