मुंबई, 24 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर महायुतीत निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत. शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना या विषयावर आणि जरांगे पाटील यांच्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या घडामोडींमुळे महायुतीतील राजकीय वादावर पडदा टाकण्याचा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
तत्पूर्वी, रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर थेट आरोप केले होते. भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील मैत्री दर्शवणारा फोटो त्यांनी समोर आणला होता. तसेच, मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून आपल्याला जाणीवपूर्वक दाबले जात असल्याचा आरोप कदम यांनी केल्यामुळे भाजप नेते तीव्र नाराज झाले आहेत. यातूनच दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपांना वेग आला.
वाढता तणाव पाहता मंत्री उदय सामंत यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदम यांच्या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेनंतर सामंत वगळता शिवसेनेच्या एकाही नेत्याने कदम यांची पाठराखण करत भाजपला प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम पक्षातच एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मित्रपक्षाकडून होत असलेल्या या कथित कटाबाबत नाराजी व्यक्त करत रामदास कदम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, कदम यांच्यावरील टीकेला कुणीही उत्तर न दिल्याने शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय केवळ नावापुरता राहिला असून, मूळात ही युतीच्या नेत्यांमधील मान-अपमानाची लढाई असल्याचे अनेक नेते खासगीत बोलत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुका हे या अंतर्गत वादाचे उत्तम उदाहरण असल्याचेही नेत्यांकडून सांगितले जाते. आता शिंदेंच्या सूचनेनंतर शिवसेना आणि भाजपमधील या वादाला पूर्णविराम मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला येणार, ई-केवायसी नसल्यास अडकणार पैसे
- मनोज जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये पोहोचवले? ऑडिओ क्लिपच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- लाडकी बहीण योजनेनंतर आता एकल महिलांसाठी नवीन योजना; १२ लाख जणींना मिळणार आर्थिक आधार
Quick Answers
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपच्या विषयावर आणि जरांगे पाटील यांच्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
रामदास कदम यांनी भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील मैत्री दर्शवणारा फोटो समोर आणला होता.
मित्रपक्षाकडून होत असलेल्या कथित कटाबाबत नाराजी व्यक्त करत रामदास कदम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








