मनोज जरांगेंचा मोठा दावा; ‘माझ्याकडे एक बॉम्ब आणि दुसरा अणूबॉम्ब, वेळ आल्यावर फोडणार’

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप्सचा खळबळजनक दावा करत, बदनामी करणाऱ्यांना ‘बॉम्ब’ आणि ‘अणूबॉम्ब’ फोडून उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil and Ramdas Kadam speaking on recent political allegations

प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “त्या दिवशी ऐकवलेली ऑडिओ क्लिप काहीच नाही, माझ्याकडे आणखी एक बॉम्ब आणि त्यानंतर फोडण्यासाठी दुसरा अणूबॉम्ब आहे,” असा खळबळजनक इशारा त्यांनी (Manoj Jarange) दिला आहे. आपल्यावर आधी सर्व आरोप होऊ द्यायचे आणि नंतर हे दोन्ही बॉम्ब फोडायचे, अशी आपली भूमिका असल्याचे जरांगे म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे आता या क्लिप्स कुणाच्या विरोधातील आहेत, याची चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधताना जरांगे यांनी गंभीर आरोप केले. शिंदे यांच्या लोकांनी आपल्याविरोधात बोलण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टीम तयार केल्या असून, त्यांच्या माध्यमातून आपली बदनामी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. “त्यांना आता जेवढी बदनामी करायची आहे ती करू द्या, नंतर मी एकदाच बॉम्ब काढतो,” असा थेट इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

या घडामोडींवरून राज्य सरकारला धारेवर धरणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जरांगे यांनी कौतुक केले. राज ठाकरे हे बुद्धीच्या जोरावर विकासाचे व्हिजन देणारे नेते असून, ते सत्य बोलतात असे जरांगे म्हणाले. “सध्या सुरू असलेले षडयंत्र भयंकर असून, हे कोणतेही एआय (AI) नसून सत्य आहे, याची राजसाहेबांनाही माहिती आहे,” असे ते म्हणाले. मात्र, जनता सत्य स्वीकारत नाही आणि राज ठाकरेंच्या तळमळीला मतातून यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सत्ताधाऱ्यांची गुप्तचर यंत्रणा आपण कमजोर केली असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. ‘हा आपल्या यंत्रणेचे कंबरडे मोडू शकतो, हे पोरगं सोपं नाही’, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली आहे. त्यामुळे ते सत्याचा मार्ग न स्वीकारता लवकरच आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या मागे लागतील, पण आपण त्यांना पुरून उरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘मनोज जरांगे सच्चे कार्यकर्ते असून, त्यांना ५०० कोटी रुपये कशाला लागतील? तसे असते तर ते राजकारणात आले असते,’ या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरही जरांगेंनी प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार हे सत्य सांगणारे नेते असून, आजच्या भाजपला ते पटत नसल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि मराठ्यांवर कोणताही डाव टाकणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त करत, “जर त्यांनी डाव टाकलाच, तर मी दुसरा फासा टाकायला पक्का आणि मोकळा आहे,” असा स्पष्ट इशाराही जरांगे यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

त्या दिवशी ऐकवलेली ऑडिओ क्लिप काहीच नसून, आपल्याकडे आणखी एक बॉम्ब आणि त्यानंतर फोडण्यासाठी दुसरा अणूबॉम्ब असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. आधी आपल्यावर सर्व आरोप होऊ द्यायचे आणि नंतर योग्य वेळी हे दोन्ही बॉम्ब फोडायचे, अशी त्यांची भूमिका आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही