प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. दसऱ्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) हालचालींना मोठा वेग येणार असून, पगारवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील हा आयोग देशभरातील विविध कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि इतर प्रतिनिधींच्या गाठीभेटी घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरुच्या यशस्वी दौऱ्यानंतर आता दसऱ्यानंतर लगेचच एक अत्यंत महत्त्वाची बैठक नियोजित करण्यात आली आहे.
8th Pay Commission
येत्या २२ आणि २३ ऑक्टोबरला वेतन आयोगाची टीम थेट मुंबईत धडकणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांची मूळ वेतन रचना, पेन्शन धोरण आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, ट्रॅक देखभाल, सिग्नल यंत्रणा आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचे धोके समजून घेण्यासाठी आयोग मध्य रेल्वेच्या (CR) नियंत्रण कक्षांना आणि विविध विभागांनाही प्रत्यक्ष भेट देणार आहे.
दुसरीकडे, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केवळ दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता (DA) वाढवून भागत नाही. कर्मचाऱ्यांचं राहणीमान सुधारण्यासाठी मूळ वेतनातच बदल होणं गरजेचं असतं. त्यामुळेच या नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर, देशातील तब्बल ४९ लाख कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना याचा थेट आर्थिक फायदा होणार आहे.
थोडक्यात सांगायचं तर, आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासूनच धरली जाणार असली, तरी आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी मे २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अहवाल सादर झाल्यानंतर अर्थ मंत्रालय आणि कॅबिनेटच्या मंजुरीची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार जमा होण्यास सुरुवात होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या संकटात देवेंद्र फडणवीसांचं मोठं आवाहन, शेतकऱ्यांना दिला ‘हा’ शब्द
- संतोष देशमुख हत्या प्रकरण : आरोपी विष्णू चाटेचा जामीन उच्च न्यायालयाकडून फेटाळला
- मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









