१६ नोव्हेंबरला नवे चक्रीवादळ धडकणार; हवामान विभागाकडून अनेक राज्यांना अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात १६ नोव्हेंबर रोजी नवे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून, हवामान विभागाने दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.

Published On: 

Satellite view of cyclone forming in Bay of Bengal with rain alert

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा १६ नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांतील हे तिसरे चक्रीवादळ असून, यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. १४ नोव्हेंबर रोजी याची तीव्रता अधिक वाढेल, तर १५ नोव्हेंबरला त्याचे डिप्रेशनमध्ये (चक्रीवादळपूर्व स्थिती) रूपांतर होईल. त्यानंतर हा पट्टा उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल आणि १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याची दाट शक्यता आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये १३ ते १५ आणि १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान, तर लक्षद्वीपमध्ये १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. १५ नोव्हेंबरला तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यनम आणि रायलसीमा भागात १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पाऊस राहील, तर १८-१९ नोव्हेंबरला आंध्रची किनारपट्टी आणि यनममध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल.

पूर्व भारतातही हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान प्रचंड पाऊस पडणार असून, १७ नोव्हेंबरपर्यंत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहतील. १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी ओडिशा तसेच गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडेल. १९ तारखेला पश्चिम बंगालमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

उत्तर आणि पश्चिम भारतातही या बदललेल्या हवामानाचा परिणाम दिसून येईल. १३ नोव्हेंबरला जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार, तर १४-१५ नोव्हेंबरला बऱ्यापैकी पाऊस राहील. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पावसाची हजेरी असेल. तसेच १३-१४ नोव्हेंबरला दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि १४-१५ नोव्हेंबरला पश्चिम राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेशात, तर १५ नोव्हेंबर रोजी पूर्व राजस्थानात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही