Share

जरांगेंच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा हल्लाबोल; ‘स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आंदोलन’

मराठा आरक्षण आंदोलनावर भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी मनोज जरांगे यांच्यावर स्वार्थासाठी आंदोलन केल्याचा गंभीर आरोप केला.

Published On: 

Vijay Rahangdale on Manoj Jarange

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील उद्यापासून (२९ ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीच्या दिशेने जाताना दिसत आहेत.

अशा परिस्थितीत, भाजपचे आमदार विजय रहांगडाले (Vijay Rahangdale) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनावर कडक टीका केली आहे. स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मनोज जरांगे आंदोलन करत असल्याचा आरोप रहांगडाले यांनी केला आहे.

Vijay Rahangdale on Manoj Jarange

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नेत्यांवर टीका करणे आणि स्वतःचा स्वार्थ साधणे हाच जरांगे यांच्या आंदोलनाचा एकमेव उद्देश आहे, असा गंभीर आरोप रहांगडाले यांनी केला आहे.

विजय रहांगडाले म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश फक्त भाजप नेत्यांना खाली दाखवणे, शिव्या देणे आणि स्वतःचे नाव मोठे करणे हाच राहिलेला आहे. स्वतःच्या हिताकरिता आणि स्वार्थासाठी हे आंदोलन चालवले जात आहे, अशी टीका विजय रहांगडाले यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांतूनच अखेरीस मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा उद्देश साध्य होईल, असेही आमदार रहांगडाले यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install