नाशिक : नाशिकमधील (Nashik) ‘सिंहस्थ कुंभमेळ्या’च्या पार्श्वभूमीवर आयोजित तीन दिवसीय ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी उपस्थिती लावली. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. (Nashik Kumbh Mela)
अनेक विकासकामे एकाच वेळी सुरू असल्यामुळे नाशिककरांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत, कामे पूर्ण झाल्यावर हेच नागरिक या उपक्रमांचे स्वागत करतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. याच मंचावरून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तरही दिले.
Devendra Fadnavis at Nashik Kumbh Mela
नाशिकच्या विकासकामांवर उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकाच वेळी सर्व कामे सुरू केल्याने नाशिककरांना आणि त्र्यंबकमधील लोकांना त्रास होत आहे. लोकांच्या शिव्या देखील आम्हाला खाव्या लागतात. गिरीश भाऊंना आणि दादा भुसे यांना जास्त खाव्या लागतात, कारण ते इथे राहतात. आमदारांना आणि मंत्र्यांना शिव्या खाव्या लागतात. पण काळजी करू नका, कुठलेही परिवर्तन आपण करतो तेव्हा शिव्या खाव्याच लागतात.”
“परंतु, ज्या दिवशी ही कामे पूर्ण होतील, त्या दिवशी हीच सर्व मंडळी आपल्याला फुलांचे हार देखील घालतील. चांगले काम करताना दोन शिव्या खायची तयारी ठेवा. फक्त आपण जे काम करत आहोत, ते जनहिताचे असले पाहिजे आणि पारदर्शी असले पाहिजे. या दोन गोष्टी असतील, तर आपल्याला कुठलीही काळजी करायचे कारण नाही.” असेदेखील फडणवीस म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि झालेल्या खर्चाबाबतचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली होती.
यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “सगळे प्रोजेक्ट्स हे जाहीर आहेत, लपलेला एकही प्रोजेक्ट नाही. सगळे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, त्यांनी सर्व चेक करून घ्यावेत. ज्यांच्या मनात भ्रष्टाचार आहे, ज्यांच्या आचरणात भ्रष्टाचार आहे, त्यांना रोज इथे येऊन भ्रष्टाचार दाखवायचा आहे.”
“आता त्यांची हीच स्ट्रॅटेजी आहे की, ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरोप करायचे, खोटं बोलायचं आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. पण त्यांनी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील ‘ये पब्लिक है ये सब जानती है’,” असा पलटवार फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोमांस कारवाई! ६३ वर्षांचा आजोबा एकटा २०० किलो गोमांस कसं कापू शकतो? पोलिसांचा ‘माफियांना’ वाचवण्याचा डाव?
- जरांगेंच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा हल्लाबोल; ‘स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आंदोलन’
- ‘मुंबई ही मासेमारी करणाऱ्यांची’; ससून डॉकच्या पाहणीनंतर पवारांचं मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











