Share

‘मुंबईला 45 लाख गाड्या येणार’; जरांगे यांचा सरकारला मोठा इशारा

मनोज जरांगे यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा देत 45 लाख गाड्या येणार असल्याचा दावा केला.

Published On: 

Manoj Jarange Maratha protest

Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. मराठा समाज मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे जमा होत आहे. केवळ मराठवाडा आणि गोदावरी पट्ट्यातूनच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातूनही समाजबांधव मोठ्या संख्येने तिथे दाखल होत आहेत.

दरम्यान, जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने हट्टीपणा न करता मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यापूर्वीच त्यांनी ‘वर्षा’ येथे आंदोलन करण्याचा आपला इरादा व्यक्त केला होता. आता त्यांनी मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची संभाव्य संख्याही जाहीर केली आहे. त्यांच्या या पावलामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Maratha protest

मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनाची पुढची दिशाही स्पष्ट केली आहे. मुंबईला ४५ लाख गाड्या येणार आहेत. आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणून बुजून करत आहेत आणि त्याला छुपा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांचा आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला.

“मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून ते करत आहेत. आम्ही जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत हलणार नाही. चर्चा करायला कधी ही या ना, काय अडचण आहे, आम्ही मात्र हलणार नाही. यांना मराठ्यांच्या पोरांच चांगलं होवू द्यायचं नाही,” असे जरांगे पाटील म्हणाले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मराठा समाजाचे बांधव महिनाभराचा पुरेसा साठा घेऊन ‘अंतरवाली’कडे निघाले आहेत. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातून चार पिकअप गाड्यांमधून त्यांनी प्रस्थान केले.

‘अंतरवाली’ला भेट दिल्यानंतर मुंबईकडे जाण्याचा आपला मानस असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले. एक महिन्याचे राशन घेऊन निघालो आहोत, नोंदी असून प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाटा येथे छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर वाहने अडवून हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी बेमुदत रस्ता रोकोची घोषणा करणारे फलक हातात घेऊन हे आंदोलन केले. यावरून हे आंदोलन आता राज्यभर पसरत असल्याचे दिसून येते. राज्यातील विविध भागांतून मराठा समाजाचे लोक अंतरवाली सराटीच्या दिशेने जात आहेत, तर काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलने केली जात आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install