Share

प्रेमापोटी चक्क MPSC चा पेपर फोडला! ‘लव्हस्टोरी’मुळे औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द

प्रियकराने प्रेयसीसाठी चक्क MPSC चा पेपर फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे औषध निरीक्षक (गट-ब) पदाची संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Published On: 

MPSC FDA Drug Inspector exam cancelled due to paper leak love story in Maharashtra

MPSC Paper Leak: प्रेमासाठी माणूस काय करेल याचा काही नेम नाही. पण एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी चक्क महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) पेपरच फोडला आहे. अन्न आणि औषध प्रशासनातील (FDA) औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरतीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासात एका ‘लव्हस्टोरी’मुळे हा पेपर फुटल्याचं उघड झालं. त्यामुळे आयोगाला आता संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करावी लागली आहे.

MPSC Paper Leak: लव्हस्टोरीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचं नुकसान

एका तरुणाने आपल्या प्रेयसीला परीक्षेत पास करण्यासाठी चक्क MPSC च्या एका कर्मचाऱ्याशी ‘सेटिंग’ लावली. खालच्या स्तरावरील या कर्मचाऱ्याकडून त्याने थेट प्रश्नसंचच मिळवला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा पेपर फक्त त्या एकाच तरुणीला मिळाल्याचं समोर आलं आहे. पण या एका चुकीचा फटका मात्र शेकडो प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसला. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या मेहनतीवर एका प्रेमप्रकरणाने पाणी फेरलंय.

२२ मार्च २०२६ रोजी या पदासाठी चाळणी परीक्षा झाली होती. त्यानंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. १ ते २२ जुलै दरम्यान त्यांच्या मुलाखतीही पार पडल्या. २२ जुलैला गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हा पेपरफुटीचा सगळा प्रकार उघडकीस आला. पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संताप आहे.

दुसरीकडे, आयोगाने विद्यार्थ्यांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. आता या पदांसाठी नव्याने फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची किंवा कोणतीही फी भरण्याची गरज नसेल. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होईल, असं आयोगाने स्पष्ट केलंय. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही