Arvind Kejriwal । अरविंद केजरीवाल यांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल; म्हणाले…

Arvind Kejriwal | दिल्ली: आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडुन समन्स बजावले आहेत. सीबीआयने केजरीवाल यांना रविवारी (१६ एप्रिल) चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत दिल्लीमध्ये शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देण्याकडे केजरीवाल यांचा कल पाहायला मिळाला आहे तर गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्यावर होणाऱ्या चौकशीमुळे आप सरकार बद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान, या समन्सवरून अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल: (What Arvind Kejriwal said)

“गेल्या वर्षभरापासून भाजपाकडून उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी आमच्यावर आरोप केले जात आहेत. त्यानंतर तपास यंत्रणाही सर्व कामं सोडून आमच्या मागे लागल्या आहेत. सीबीआय आणि ईडीकडून रोज कोणालातरी पडकडून त्रास दिला जात आहे . त्यांच्यावर आमच्याविरोधात बोलण्यासाठी दबाव आणला जातो आहे”. असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना केला. तसचं पुढे केजरिवाल म्हणाले की, मला काल सीबीआयने समन्स बजावले. त्यांनी आमच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकदा आमच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. मात्र, त्यांना एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. मला पंतप्रधान मोदींना विचारायचं आहे की या देशात नेमकं काय चाललंय? त्यांना वाटत असेल की मी चोर आहे, तर मग या पृथ्वीतलावर कोणीही इमानदार नाही. असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, केजरीवाल यांनी तपास यंत्रणनेव्हर देखील प्रश्न उपस्थित केले. सीबीआय आणि ईडीने न्यायालयातही खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. एकबाजूला मनीष सिसोदिया यांनी त्यांचे १४ फोन नष्ट केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यापैकी चार फोन सध्या सिसोदियांकडे आहेत, असंही ईडीचं म्हणणं आहे. मग सिसोदियांनी जर १४ फोन नष्ट केले, तर त्यांच्याकडे चार फोन कसे काय? याचाच अर्थ तपास यंत्रणांनी खोटं बोलून आमच्यावर गुन्हे दाखल केला आहे.असा स्पष्ट आरोप अरविंद केजरीवाल त्यांनी केला. तसचं भाजप सत्तेसाठी इतर पक्षाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यांच्या या आरोपावरून सरकारला प्रश्नांची उत्तरे घ्यावी लागणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.