Coconut Sugar | कोकोनट शुगरचा वापर केल्याने चेहऱ्याला मिळतात ‘हे’ फायदे

Coconut Sugar | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin Care) अधिक घ्यावी लागते. उष्णतेमुळे चेहऱ्यावर घाम येणे, प्रदूषण, धूळ, माती इत्यादीमुळे चेहऱ्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यासाठी तुम्ही कोकोनट शुगरचा वापर करू शकतात. कोकोनट शुगर आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोकोनट शुगरपासून बनवलेला फेस स्क्रब किंवा फेस पॅक वापरू शकतात. कोकोनट शुगरचा वापर केल्याने त्वचेला खालील फायदे मिळू शकतात.

तेलकट त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for oily skin-Coconut Sugar For Skin Care)

कोकोनट शुगरच्या मदतीने तेलकट त्वचेची समस्या दूर होऊ शकते. कोकोनट शुगरमध्ये ग्लायकोलिक अॅसिड आणि अल्फा-हायड्रॉक्सी अॅसिड आढळून येते, जे तेलकट स्वतःची समस्या दूर करण्यास मदत करते. कोकोनट शुगरच्या मदतीने चेहऱ्यावरील चमक देखील वाढू शकते.

वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात (Signs of aging are reduced-Coconut Sugar For Skin Care)

कोकोनट शुगरचा फेस पॅक वापरल्याने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात. याचा वापर केल्याने त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्याची समस्या दूर होऊ शकते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या स्क्रबचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

त्वचा मऊ होते (The skin becomes soft-Coconut Sugar For Skin Care)

कोकोनट शुगरच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होऊ शकते. त्वचा चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी तुम्ही कोकोनट शुगरचा फेस पॅक वापरू शकतात. यासाठी तुम्ही कोकोनट शुगर आणि ऑलिव्ह ऑइलचा फेस स्क्रब वापरू शकतात. हा फेस स्क्रब वापरल्याने तुमची त्वचा डागमुक्त आणि चमकदार होऊ शकते.

कोकोनट शुगरच्या मदतीने चेहऱ्यावरील वरील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही बडीशेपचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

बडीशेपचे पाणी (Fennel water-Glowing Skin)

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बडीशेपचे पाणी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सकाळी त्या पाण्याने स्वच्छ चेहरा धुवावा लागेल. बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील डाग निघून जातात, त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन देखील करू शकतात. हे पाणी प्यायल्याने चेहऱ्यासोबत शरीरही निरोगी राहू शकते.

बडीशेप पावडर (Fennel powder-Glowing Skin)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बडीशेप पावडरचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप पावडरमध्ये प्रमाणानुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या