Share

Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

Mumbai-Pune Highway Accident | खोपोली : आज (15 एप्रिल) पहाटे 4 च्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) एका खासगी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. ही बस दरीत कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला असून या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या बसमध्ये 40 ते 45 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट हे पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याहून परत येताना या वादक गटाच्या बसचा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोठा अपघात झाला. ही बस शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात दरीत कोसळली. हा भीषण अपघात पहाटे 4 च्या सुमारास झाल्याची माहिती मिळाली आहे. तसंच या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

तसचं वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घाट परिसर असल्यामुळे तिथे उतार खूप जास्त आहे. वाहनचालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला असल्याची शक्यता आहे. या बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते. त्यातील 27 प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे. तर इतरांना वरती काढण्याचं काम सध्या सुरू आहे. या बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस यांचा सहभाग आहे. तसंच आमच्या माहितीनुसार, या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.”

दरम्यान, या अपघातातील जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप आणि आयआरबीचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. तसचं तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातात सापडलेल्या लोकांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Mumbai-Pune Highway Accident | खोपोली : आज (15 एप्रिल) पहाटे 4 च्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) एका खासगी बसचा …

पुढे वाचा

India Maharashtra Mumbai Politics Pune

Join WhatsApp

Join Now