Share

Satya Pal Malik | “मी पंतप्रधान मोदींना सांगितलं पुलवामा हल्ला आपल्याच चुकीमुळे झालाय, पण त्यांनी मला…”; माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट

🕒 1 min read Satya Pal Malik | नवी दिल्ली : आपल्या सर्वांना 14 फेब्रुवारी 2019 ही तारीख चांगलीच लक्षात असेलच. कारण हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस असून या दिवशी जम्मू- -श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवानांच्या ट्रकला एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरनं धडक दिली. यामध्ये सीआरपीएफचे तब्बल 40 … Read more

Published On: 

🕒 1 min read

Satya Pal Malik | नवी दिल्ली : आपल्या सर्वांना 14 फेब्रुवारी 2019 ही तारीख चांगलीच लक्षात असेलच. कारण हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस असून या दिवशी जम्मू- -श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवानांच्या ट्रकला एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरनं धडक दिली. यामध्ये सीआरपीएफचे तब्बल 40 जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संताप उसळला होता. तसंच या हल्ल्यामागचा नेमका सुत्रधार कोण? याबाबत अद्यापही समजलेलं नाहीये. अशातच भाजपचे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्यपाल मलिक यांनी नुकतीच ‘वायर’ ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले सत्यपाल मलिक? ( What did Satyapal Malik say)

सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की, “सीआरपीएफनं (CRPF) एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण रस्त्याने एवढा मोठा ताफा कधीही जात नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केली, राजनाथजींकडेही मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. जर मला त्यांनी विचारणा केली असती, तर त्यांना मी एअरक्राफ्ट दिलं असतं. काहीही करून दिलं असतं. त्यांना फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती.” तसंच “मी त्याच संध्याकाळी पंतप्रधान मोदींना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलाय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलंच नसतं. पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा”. असंही सत्यपाल मलिक म्हणाले.

तसंच या मुलाखतीतील एक व्हिडीओ क्लिप काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करण्यात आली आहे. तर काँग्रेसनं ट्विट करत म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi), तुमच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला (Pulwama Attack) आणि 40 जवान शहीद झाले आहेत. जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळालं असतं, तर दहशतवाद्यांचा कट फसला असता. या चुकीसाठी तुम्ही कारवाई करणं अपेक्षित होतं, पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलंच नाही तर स्वत:ची प्रतिमा जपण्याचाही प्रयत्न केला.” असं या ट्विटमध्ये म्हंटल आहे. तर सत्यपाल मलिकांच्या या गौप्यस्फोटामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या