Nana Patole । “भाजपला गांधी नावाची भिती वाटते” नाना पटोलेंचा चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार

Nana patole | मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी भेट झाली. भेटुदरम्यान आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. तर काँग्रेसचे झालेले डॅमेज भरून काढण्यासाठी राहुल गांधी ( Rahul Gandhi) महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची भेट घेत असल्याचं म्हटलं जातंय. याच पार्श्वभूमीवर ते लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविषय भाष्य केलं तो त्यावरून चांगलाच वाद पेटला होता. आता हाच विषय पकडून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आधी माफी मागावी मग महाराष्ट्रात पाऊल ठेवावं, अन्यथा राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बावनकुळेवर पलटवार केला आहे.

भाजपला गांधी नावाची भीती वाटते -(BJP fears the name Gandhi)

भाजपाकडून होणाऱ्या टीकेला उत्तरं देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाला गांधी नावाची भिती वाटते. मी सावरकर नाही तर गांधी आहे असं बोलणं जर गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्हाला मान्य आहे. जनतेची दिशाभूल करणं आणि खोटा प्रचार करणं एवढीच कामं भाजपकडून राज्यात होत आहे. आता राहुल गांधींना ते घाबरू लागले आहेत. तसचं मुळात गांधी या नावातच दम आहे, या नावाला घाबरून इंग्रजही पळाले. मी सावरकर नाही गांधी आहे या वाक्याचा तुम्हाला काय त्रास आहे. याकडे लक्ष न देता जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष द्या. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. लोकांची दिशाभूल करून नव्या वादांचा तमाशाच यांनी सुरू केला आहे. असं सडेतोड उत्तर पटोले यांनी दिलं.

राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लावला तर बघा:( If you even touch Rahul Gandhi’s hair, see)

दरम्यान, पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, सध्या भाजपमधील जी लोक बोलतात ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, गुजरातची असेल तर मला माहिती नाही. परंतु महाराष्ट्रात ही संस्कृती आणण्याचा प्रयत्न करू नका. राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लावला तर यांची काय हालत होईल ते त्यांनी पाहावं. मी त्यांच्यासारखा धमकावत नाही. परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावू नका एवढची माझी विनंती आहे. माझं यांच्याप्रमाणे चॅलेंज नाही विनंती आहे. अशा प्रकारे पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.