Dandruff | आवळ्याचा ‘या’ पद्धतीने वापर करून केसातील कोंडा होऊ शकतो दूर

Dandruff | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलती जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतेक लोक केसांची संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्ये बहुतांश लोकांना कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. केसातील कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकतात. आवळ्यामध्ये (Amla) आढळणारे गुणधर्म केसातील कोंडा सहज दूर करू शकतात. केसांतील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने आवळ्याचा वापर करू शकतात.

आवळा पेस्ट (Amla paste-For Dandruff)

केसातील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या पेस्टचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळा पावडरमध्ये आठ ते दहा तुळशीचे पाने बारीक करून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास केसांवर लावून ठेवावी लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस हर्बल शाम्पूने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते आणि केस मऊ आणि चमकदार होतात.

आवळा आणि कडूलिंब (Amla and bitter lemon-For Dandruff)

केसातील कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आवळा आणि कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. आवळा आणि कडुलिंब आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात, जे केसातील कोंड्याची समस्या सहज दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला आठ ते दहा कडुलिंबाची पाने एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. हे पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. शाम्पूने केस धुतल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण केसांना लावावे लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसातील कोंडा दूर होतो आणि केस चमकदार होतात.

आवळा आणि दही (Amla and curd-For Dandruff)

केसांची काळजी घेण्यासाठी आवळा आणि दह्याचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. दह्यामध्ये आढळणारे अँटी फंगल गुणधर्म स्कॅल्प इन्फेक्शन आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला तीन चमचे दह्यामध्ये दोन चमचे आवळा पावडर मिसळून घ्यावी  लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसातील कोंडा सहज दूर होऊ शकतो.

केसातील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने आवळ्याचा उपयोग करू शकतात. त्याचबरोबर कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील सोप्या पद्धती वापरू शकतात.

मध आणि दालचिनी (Honey and cinnamon-For Blackheads)

कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मध आणि दालचिनी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये दालचिनी पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हलक्या हाताने कपाळावर स्क्रब करावे लागेल. स्क्रब केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित असे केल्याने कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

अंडी (Egg-For Blackheads)

अंडी फक्त आपल्या आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी अंडी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये आढळणारे घटक कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला अंड्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे ब्लॅकहेड्सवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.