Ashish Shelar | “…म्हणून लोक सकाळी टीव्ही बंद ठेवतात,” आशिष शेलारांची संजय राऊतांवर जहरी टीका

Ashish Shelar | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की चाललय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच्या मनात निर्माण होत आहे. सत्तांतरानंतर एकमेकांवर चालू असलेलं टिका- टिप्पनीचं सत्र थांबायच नाव घेत नाही. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या वक्त्याव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. तर आता संजय राऊतांच्या या प्रतिकियेला भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोटक शब्दात टीका केली आहे.

लोक सकाळी 9.30 टीव्ही बंद करतात : आशिष शेलार (People switch off TV at 9.30 am: Ashish Shelar )

माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणले की,ल रात्री 9.30 ला लोकं टीव्ही लावतात कारण त्यांना सिरियल बघायची असते. लोक सकाळी 9.30 टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर येड्यासारखा बडबडतो. म्हणून लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. जर हिंमत असेल तर संजय राऊत यांनी माझ्या घराखाली यावं, त्यांना मी 40 लोकांचे सर्टिफिकेट देतो, असं आव्हान देखील आशिष शेलार यांनी दिलंय. तसचं त्यांनी लोकशाही धोक्यात आहे असा अप्रचार करू नये. लोकशाही मुळेच आज ते जमिनीवर उभे आहेत असं देखील शेलार म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत (What did Sanjay Raut say )

देशात संविधान नाही, कायद्याचं अस्तित्व नाही, हम करे सो कायदा अशी स्थिती असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. तसेच बाबासाहेब आंबेडकरांना जर श्रद्धांजली वहायची असेल तर पुन्हा एकदा कायद्याच राज्य प्रस्थापित करणे गरजेचे आहे. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-