Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Pune Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक … Read more

Published On: 

Pune Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये समुपदेशक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक प्रशिक्षक आणि शिलाई मशिन दुरुस्तीकार पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Pune Municipal Corporation) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Pune Municipal Corporation) इच्छुक उमेदवारांना दिनांक 21 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.pmc.gov.in/landing/mar.html

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1Yxtn0RFitR3A9MoBUv_zj5T5OLwQUneK/view

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही