National Health Mission | महाराष्ट्र आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद यांच्याअंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी, वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी, फिजिशियन आणि सर्जन पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (National Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (National Health Mission) उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नं. २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1ECGt0ybW71LNW0QTWr10Xm3yt1qF3uJG/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://osmanabad.gov.in/

महत्वाच्या बातम्या

Back to top button