IPL 2023 | CSK ला मोठा धक्का! दुखापतग्रस्त धोनीच्या अनुपस्थित ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग (Chennai Super King) संघाची सुरुवात खराब झाली. पराभव आणि दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे संघाचं टेन्शन वाढलं आहे. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याची जागा आता कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. संघाचे हेड कोच फ्लेमिंग यांनी त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे धोनी पुढील सामन्यात खेळू शकणार की नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे. धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) किंवा मोईन अली (Moeen Ali) संघाचा कर्णधार होऊ शकतो.

गेल्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर मोईन अलीने इंग्लंड संघाची कमान सांभाळली होती. मोईन अलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर मोईन अलीच्या नेतृत्वाखाली पराभूत केले होते. तर दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे ऋतुराजच्या नावाच्या देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये 12 एप्रिल रोजी सामना पार पडला होता. या सामन्यामध्ये चेन्नईला शेवटच्या बॉलवर पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. धोनीला दुखापतीमुळे राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात धावताना त्रास जाणवत होता. त्याच्या या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सचे टेन्शन वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.