Sharad Pawar । राहुल गांधींबरोबरच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

Sharad Pawar । दिल्ली : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बुधवारी (12 एप्रिल )दिल्ली मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीला न गेल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत काल माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे टाळले होत. परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली आहे. या बैठकीनंतर शरद पवारांनी माध्यमाशी बोलताना मोठं विधान केलं आहे. तर भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली असल्याचं बोललं जातं आहे.

काय म्हणाले शरद पवार (What did Sharad Pawar say?)

भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा जो विचार मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडला, तोच विचार आमचा आहे. परंतु फक्त विचार करून उपयोग नाही, त्यावर पूर्ण क्षमतेनं काम करण्याची गरज आहे. काही राजकीय पक्ष असे देखील आहेत, ज्यांची विचारधारा आमच्याबरोबर काम करण्याची आहे. त्यांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांनी लक्ष केंद्रीत केलं तर मार्ग आणखी सोपा होईल. असं देखील पवार म्हणाले. तसचं हि सुरुवात आहे. यानंतर बाकीचे जे महत्त्वाचे विरोधी पक्ष आहेत, जसं की.. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल किंवा इतर विरोधी पक्ष ज्यांच्याशी अद्याप चर्चा झाली नाही, अशा नेत्यांना भेटून त्यांना या प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. असही शरद पवारांनी म्हटलं.

पवारांच्या या विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे या विधानावरून राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आता आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने विरोधी पक्ष म्हणून भाजप विरोधात कंबर कसली आहे. येणार काळात राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अदानी प्रकरणावरून शरद पवार यांनी केलेल्या भाष्यानंतर राहुल गांधी आणि शरद पवार यांची एक पहिलीच बैठक होती. यामुळे एकजुटीसाठी पवार आणि राहुल गांधी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या-