Share

Abdul Sattar | “२४ तासात पिकांच्या पंचनाम्याचा आकडा येणार “; अब्दुल सत्तारांचं शेतकऱ्यांना आश्वासन

Abdul Sattar | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे( Unseasonal rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात गारपिटीने फळबागा आणि हंगामी पिकांची नासाडी झाली आहे. नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून शेतकरी सरकारकडे मदत मागत आहेत. हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे असं म्हंटल जातंय परंतु प्रत्येक्ष मदत मिळत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत येत्या २४ तासात पिकांच्या पंचनाम्याची आकडेवारी येणार, असं म्हणत तात्काळ मदत करण्यात येईल असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी सोबत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर आपली प्रतिक्रिया देखील दिलीय.

तसचं दोन काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला होता. यामध्ये सर्वात जास्त कांद्याच्या पिकांचं नुकसान झालेल्या नाशिक जिल्यातील काही गावात त्यांनी पाहणी केली तसच अहमदनगर, जळगाव, धाराशिव इथल्या शेतकऱ्यांची भेट देखील घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय म्हणाले अब्दुल सत्तर : (What Abdul Sattar said )

मुख्यमंत्र्यांनी काही भागात पाहणी केलेली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंद वेळोवेळी देत आहेत. तर याआधी देखील राज्यात पावसामुळे किती नुकसान झालं याचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने शासकीय पातळीवर त्वरित दखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी विभाग अधिकारी कामाला लागले आणि नुकसानीचे पंचनाम्यांच्या कामाला वेग आला. आणि येत्या २४ तासात पंचनाम्याची आकडेवारी मिळणार असल्याचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

तसचं अब्दुल सत्तर यांनी आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावरून टोला देखील लगावलाय. “सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आज हे बोलण्याचा शहाणपणा सुचला, सत्य बोलणारा आणि दिलेला शब्द पाळणारा पुढारी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. असं देखील सत्तर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Abdul Sattar | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे( Unseasonal rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर …

पुढे वाचा

Ahmednagar Chhatrapati Sambhajinagar India Maharashtra Marathi News Nashik Politics Pune

Join WhatsApp

Join Now