Ramdas Athawale | अजित पवार माझ्या पक्षात आले तर त्यांना मुख्यमंत्री करू – रामदास आठवले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ramdas Athawale | गेल्या अनेक दिवसांपासून विरोधीपक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी त्याची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्याचा फोन नॉट रिचेबल लागत होता त्यावरून देखील अजित पवार भाजपमध्ये (BJP) गेले असल्याची चर्चा होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं ट्वीट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर आता या चर्चेदरम्यान आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अजित पवारांना खास ऑफर दिली आहे.

काय म्हणाले रामदास आठवले …

रामदास आठवले म्हणाले की, मध्यंतरी अजित पवार आजारी होते म्हणून नॅाट रिचेबल होते. मला वाटत नाही ते भाजपमध्ये जातील. ते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत, म्हणून त्यांनी पहाटे शपथ घेतली होती. परंतु, आता तसं ते काही करणार नाहीत. जर अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच होईल. आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं आश्वासनही रामदास आठवले यांनी दिलं आहे.

दरम्यान,आठवले यांना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल विचारल असता. आठवले म्हणाले की, ते रडले म्हणून ठाकरे पडले. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. ते रडणार नाहीत. आदित्य ठाकरेंचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. असं आठवले यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-