Covid -19 update | कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ, तर २४ तासात १० हजाराचा आकडा पार!

Coronavirus Cases in India : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं (Indian Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १०,१५८ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४४,९९८ वर पोहोचली आहे. यापूर्वी म्हणजेच, ११ एप्रिलच्या तुलनेत १२ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ११ एप्रिल रोजी देशात एकूण ७,८० नवे कोरोनाबाधित आढळून आले होते.

दरम्यान, राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काल ( १२ एप्रिल ) राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे. तर आज राज्यात कोरोनाच्या १,११५ रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे तब्बल नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी राज्यात ९१९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यामधील अकोला येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे.

मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या (Maximum number of active patients in Mumbai)

तसचं मुंबई महानगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणं अनिर्वाय केलं आहे. मंगळवारी ( ११ एप्रिल) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, फक्त कोरोनाचे २४२ नवे रुग्ण आढळले. तर नागपुरात १०५, पुण्यात ५८ आणि नवी मुंबईत ५७ कोरोनाचे रुग्ण आढळतर होते. तर आज राज्यात ५,४२१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत आहे. मुंबईत सध्या १५७७ सक्रिय रुग्णसंख्या असून त्या खालोखाल ठाण्यात ९५३ आणि पुण्यात ७७६ सक्रिय रुग्णसंख्या आढळते. याचप्रमाणे आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोनाबाधितांची संख्या पुढील १० दिवसांत आणखी वाढणार आहे. परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट देखील दिसून येईल.त्यासाठी सर्वानी काळजी घेणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर गेल्या काही महिन्यांतील रुग्ण संख्येपेक्षा आज देशात सर्वाधिक रुग्ण आढळले असल्याचं देखील म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-