Karanatka Election Result | कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात ; तर काँग्रेस आघाडीवर!

Karanatka Election Result | बंगळुरू : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तोफ दणदणत होती. 10 मे ला मतदान देखील पार पडलं. भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. तर आज (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा दुपारपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. नुकतिचं मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यभरातील 36 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.

काँग्रेस 102 जागांनी आघाडीवर

याच पार्श्वभूमीवर पहिल्या 183 जागांचे कल हाती आला असून यामध्ये काँग्रेस 102 जागांनी आघाडी असल्याचे पहायला मिळत आहे. तर भाजप 81 आणि जेडीएस 15 जागांवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तसचं कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. यामध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सध्या सुरवातीच्या कलांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि जेडी (एस) चे एचडी कुमारस्वामी यांनी आघाडी घेतलीये. याशिवाय, सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, निखिल कत्ती आघाडीवर असल्याचं दिसत आहेत. यामुळे कर्नाटक निवडणुकीत भाजप सत्तेत कायम राहणार का सत्ता परिवर्तन होऊन काँग्रेस सत्तेत येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजूनही आकडे बदलताना पाहायला मिळतं आहेत यामुळे निकालाबाबत धाकधूक अजूनच वाढलेली आहे.

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.