Adani Group | ‘या’ क्षेत्रात एन्ट्री करत,अदानी समूहाने केली नव्या कंपनीची स्थापना

Adani Pelma Collieries : गेल्या काही महिन्यांपासून अदानी प्रकरनामुळे गौतम अदानी यांचा अदानी समूह व्यवसाय ठप्प होत चालला असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी अदानी समूहाने नवीन कंपनी स्थापन केली आहे, जी नवीन क्षेत्रात व्यवसाय करणार आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली आहे.

तसचं अदानी एंटरप्रायझेसने स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की त्यांनी कोळसा धुण्याचा व्यवसाय करण्यासाठी एक नवीन पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. त्या नवीन कंपनीचे नाव Pelma Collieries आहे, जी अदानी एंटरप्रायझेसची 100 टक्के मालकीची उपकंपनी आहे. 07 एप्रिल रोजी या नवीन कंपनीची स्थापना करण्यात आली होती. तर ही Pelma Collieries कोळसा हाताळणी प्रणालीसह कोल वॉशरीज बांधण्याचा आणि चालवण्याचा व्यवसाय हाती घेईल असं देखील सांगायचा आलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अदानी समूहाचे शेयर खाली घसरताना पाहायला मिळत आहेत. तर हे वर्ष अदानी समुहासाठी फारसे चांगले राहिलेले नाही. वर्षाच्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये, अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने एक वादग्रस्त अहवाल जारी करून अदानी समूहासमोर अडचणी निर्माण केल्या. तर हिंडेनबर्गने सादर केलेल्या अहवालामुळे अदानी समूहाची चांगलीच कोंडी झालेली आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात देखील सवाल उपस्थित करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट अदानी समूहाला आणि भाजपला प्रश्न विचारले आहे. याचा वाद आजून मिटला नाही तोपर्यंत अदानी समूहाने नवीन कंपनी स्थापन केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.