IPL 2023 | CSK संघावर बंदी घाला! तमिळनाडूच्या आमदारानी केली मागणी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

IPL 2023 | नुकतीच आयपीएल 2023ला सुरुवात झाली आहे. क्रिकेटप्रेमी आपापल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. तर धोनीच्या नेतृत्वातील CSK संघाचा सामना आज राजस्थानसोबत होणार आहे. आतपर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामामध्ये CSK ने दमदार कामगिरी केली आहे. परंतु तमिळनाडूच्या आमदारानं CSK संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मंगळवारी विधानसभेत क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या अनुदानाच्या मागणीदरम्यान पीएमके आमदारांनी ही माहिती दिली.

CSK वर बंदी! कारण… (Ban on CSK !Because…)

चेन्नईचा संघ आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघ आहे. तरीही आमदाराने CSK संघ बॅन करण्याची मागणी केली आहे. त्या आमदाराची मागणीत तथ्य जाणवत आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहे. एसपी वेंकटेश्वरन यांनी चेन्नईवर बंदी घालण्याची मागणी केली कारण ,चेन्नईच्या संघात तामिळनाडू राज्यातील खेळाडूंचा समावेश नाही. चेन्नई संघ जाहिरातीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. पण राज्यातील खेळाडूच या संघात नाहीत. आमच्या राज्यातील आणखी लोकांनी संघाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे या संघावर बंदी घायलायला हवी. असं त्यांनी म्हटलं आहे. एसपी वेंकटेश्वरन हे धर्मपुरी येथील आमदार आहेत.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मुद्दे केवळ जनतेच्या भावनांबद्दल सांगितले आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. आमचे नेते अय्या (डॉ. रामादोस) यांनी ‘इन सर्च ऑफ तमिळ’ ही मोहीम तरुणांमध्ये तमिळ भाषेच्या रक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरू केली आहे. संघाचे नाव चेन्नई असे असूनही हा संघ प्रतिभावान स्थानिक खेळाडूंना संधी देत ​​नाही. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर आता CSK बद्दल काय निर्णय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.