BJP | चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपमध्ये उघड नाराजी!

BJP | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात फक्त चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पूर्णपणे अडकलेले पाहायला मिळत आहेत. अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, त्यात शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग नसल्याचं वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यांच्या या व्यक्तव्यानंतर राज्यभरातून टीका होत आहेत. तर भाजपमध्ये देखील उघड नाराजी दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी असं बोलायला नको होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य हे त्याचं वैयक्तिक मत असल्याच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलार बोलताना म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचं मत हे वैयक्तिक आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या बाबतीत भाजप कधीच काही बोलले नाही. बाबरी मशीद पाडण्याची समस्त हिंदू धर्माची मागणी होती. चंद्रकांत पाटील यांनी तसं बोलायला नको होतं. तसचं शेलार यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं की, बाबरी मशीद पाडण्यात तुमच काय योगदान आहे असा सवलही शेलार यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं अयोध्येतील बाबरी मशीदीबाबत वक्तव्य- ( Chandrasekhar Bawankule’s statement regarding Babri Masjid in Ayodhya)

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर भाजपला आगामी निवडणूकांमध्ये फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आता भाजपने सावध राहण्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. पाटील यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले असून, ती पक्षाची भूमिका नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले. तसचं अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या प्रक्रियेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता, असंही बावनकुळे यांनी माध्यमांपुढे जाहीर केलं. भाजपने आपली भूमिका उघडपणे सांगितल्याने पाटील हे एकाकी पडल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.