Mint Buttermilk | उन्हाळ्यामध्ये पुदिनाच्या ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Mint Buttermilk | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ताकाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. ताक प्यायल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे ताक प्यायल्याने देखील आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण या दोन्हीमध्ये आढळणारे घटक शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. ताकामध्ये सोडियम, पोटॅशियम, आयरन, फायबर इत्यादी पोषक गुणधर्म आढळून येतात. तर पुदिन्यामध्ये अँटी बॅक्टरियल आणि अँटीऑक्सिडेंट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. उन्हाळ्यात ताकामध्ये पुदिना मिसळून प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

शरीर डिटॉक्स राहते (The body remains detox-Mint Buttermilk Benefits)

उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे ताक प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पुदिन्याचे ताक आतडे स्वच्छ करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. पुदिन्याच्या ताकाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांची संबंधित अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात.

पोटातील गॅस दूर होतात (Eliminates stomach gas-Mint Buttermilk Benefits)

उन्हाळ्यामध्ये जास्त तळलेले किंवा जास्त भाजलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने पोटात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागतो. या समस्यावर मात करण्यासाठी पुदिन्याचे ताक उपयुक्त ठरू शकते. पुदिनाच्या ताकाचे सेवन केल्याने पोटातील गॅसची समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर पुदिन्याचे ताक प्यायल्याने पोटात होणारी जळजळ देखील शांत होऊ शकते.

पोट थंड राहते (Stomach remains cold-Mint Buttermilk Benefits)

उन्हाळ्यामध्ये अनेकदा उष्माघात आणि उन्हामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत पुदिनाच्या ताकाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. पुदिन्याचे ताक प्यायल्याने पोट थंड राहते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या सहज दूर होतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुदिनाच्या ताकाचा समावेश करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये पुदिन्याच्या ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात कच्चा कांद्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

उष्माघातापासून संरक्षण (Protection against heatstroke-Onion Benefits)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना उष्माघाताच्या समस्येला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी कांदा एक उत्तम उपाय ठरू शकतो. उन्हाळ्यामध्ये नियमित कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने तुम्ही उष्माघातापासून दूर राहू शकतात. उन्हाळ्यामध्ये नियमित कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने शरीर थंड राहू शकते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Onion Benefits)

उन्हाळ्यामध्ये कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. कच्च्या कांद्यामध्ये आढळणारे गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या