Sharad pawar | शरद पवार- उद्धव ठाकरेंच्या भेटीचं कारण स्पष्ट; संजय राऊत म्हणाले..

Sharad pawar | मुंबई : सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अदानी प्रकरणावरून कुरबूर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पवार कोणती खेळी खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्याप्रमाणे ठाकरे आणि पावरांमध्ये नक्की काय बोलणं झालं? आता राजकारणात काय घडणार का अशा चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र त्यांच्या भेटी मागील कारण संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

आज खासदार संजय राऊत यांनी काल म्हणजे (11 एप्रिल) झालेल्या ठाकरे-पवार भेटी मागील कारण सांगितलं. आज ते पत्रकार परिषदमध्ये बोलत असताना म्हणाले, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची साधारण दीड तास अशी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली आहे. याचप्रमाणे भविष्यातील महाविकास आघडीची दिशा ठरवण्यावर चर्चा असून ही चर्चा सकारात्मक झाली आहे. तर शरद पवार देशाचे जेष्ठ नेते आहेत. या बैठकीत सुप्रिया सुळे देखील होत्या, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

अमित शहांनी घेतला महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती चा आढावा ( Amit Shah reviewed the political situation in Maharashtra)

दरम्यान, संजय राऊतांनी या भेटीबद्दल दिलेल्या माहितीवरून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधी पक्षांची मुठ बांधणार आल्याचं दिसून येतंय.  तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी नंतर भाजपमध्ये घडामोडींना वेग आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधून घेतला असल्याची माहिती समोर देखील समोर येत आहे. तर ठाकरे- पवार यांची आगामी काळात काय असेल तयारी याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.

महत्वाच्या बातम्या-