Ajit Pawar । अजित पवार भाजप बरोबर जाणार? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या…

Ajit Pawar । मुंबई : काल रात्री (११ एप्रिल) शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार (Sharad Pawar ) यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. तब्ब्ल दीड तास त्यांची चर्चा झाली असल्याची माहिती मिळतं आहे. महाविकास आघाडी आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अदानी प्रकरणावरील मतभेदावरून आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर हि भेट महत्वाची मानली जाते. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या एका ट्विटन खळबळ उडाली आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटने चांगलीच खळबळ उडाली आहे.

तर राज्याचा सत्तासंघर्षावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे. यादरम्यान राज्यात राजकीय उलथापालथ होणार अशी चर्चा सुरू असताना दामानिया यांनी हे ट्वीट केलं आहे. तसचं न्यायालयाच्या न्यायालयात एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकाल आल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणात काय बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमिवर सध्या राजकीय हलचालींना वेग आलेला दिसून येत आहे.

अंजली दमानिया यांच्या ट्विटने खळबळ (Anjali Damania’s tweet caused a stir)

अंजली दमानिया यांनी असं ट्विट केलं आहे की, “आज मी माझ्या कामानिमित्त मंत्रालयात गेली होती. त्या ठिकाणी एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची…” असं ट्वीटमध्ये दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटने महाविकास आघाडीची एकमुठ राहणार का ? राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी हातमिळवणी करणार का ? तर आता अजित पवारांचं काय मत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या | LATEST MARATHI NEWS | MARATHI BATMYA