Hair Care | उन्हाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते दही, जाणून घ्या वापर करण्याची पद्धत

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये धूळ, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी दही (Curd) एक सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन बी6, विटामिन डी, प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी गुणधर्म केस निरोगी ठेवू शकतात. दह्याचा वापर केल्याने केस चमकदार, मऊ आणि दाट होऊ शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने दह्याचा वापर करू शकतात.

लिंबाचा रस आणि दही (Lemon Juice & Curd For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी दही आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. या दोन्हीमध्ये आढळणारे गुणधर्म टाळूवर साचलेली घाण आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला तीन चमचे दह्यामध्ये तीन ते चार थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. केसातील कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी हा एक उत्तम उपाय ठरू शकतो.

कोरफड आणि दही (Alovera & Curd For Hair Care)

कोरफड आणि दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या अनेक समस्या सहज दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे दह्यामध्ये दोन चमचे कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस माइल्ड शाम्पूने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसांची चमक वाढू शकते.

ऑलिव्ह ऑइल आणि दही (Olive Oil & Curd For Hair Care)

उन्हामुळे जर तुमचे केस खराब होत असतील, तर दही आणि ऑलिव्ह ऑइल तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. या दोन्ही गोष्टींमध्ये आढळणारे घटक केसांना पोषण प्रदान करतात. यासाठी तुम्हाला तीन चमचे दह्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केस दाट आणि मजबूत होऊ शकतात.

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही दह्याचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये चेहरा थंड ठेवण्यासाठी तुम्ही चंदन पावडरचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

दही आणि चंदन पावडर (Curd & Sandalwood Powder For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही चंदन पावडरसोबत दह्याचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये एक चमचा दही मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तेलकट त्वचेची समस्या दूर होऊ शकते.

मुलतानी माती आणि चंदन पावडर (Multani Mati & Sandalwood Powder For Skin Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडर आणि मुलतानी माती उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा चंदन पावडरमध्ये एक चमचा मुलतानी माती आणि तीन चमचे गुलाब जल मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने सनबर्नची समस्या सहज दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या