Maharashtra Covid-19 Update | महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Covid-19 Update : 2019 पासुन कोरोनाचा प्रसार जगभर पाहायला मिळत आहे. यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या आरोग्ययंत्रनेत सुधारणा करून या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर आता पुन्हा कोरोना व्हायरसने डोक वर काढलं आहे. इतर राज्यसह महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. तर मंगळवारी (11 एप्रिल) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईत कोरोनाचे 242 नवे रुग्ण समोर आले आहेत. तसचं राज्यात 919 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोरआली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 4 हजार 875 सक्रिय रुग्ण आहेत. मृत्यू दराबाबत बोलायचे झाले तर राज्यात 1.82 टक्के तर बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्के आहे.

याचप्रमाणे हेल्थ बुलेटिननुसार राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 841 नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, यासह राज्यात आतापर्यंत कोरोना चाचण्यांची संख्या 8,67,23,707 वर पोहोचली आहे. तीन दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या बैठकीदरम्यानच्या निर्णयात लवकरच मॉकड्रिल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर कोरोनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल करण्यात येत आहे.

एका दिवसापूर्वीच (10 एप्रिल) कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट ( decrease in the number of corona patients just a one day ago )

तसंच महाराष्ट्रात एका दिवसापूर्वी कोरोनाच्या (Covid 19) रुग्णांमध्ये घट झालेली पाहायला मिळाली. तर सोमवारी (10 एप्रिल)ला राज्यात कोरोनाचे 328 रुग्ण आढळले होते आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याचप्रमाणे रविवारी (9 एप्रिल) राज्यात कोरोनाच्या च्या 788 रुग्णांची नोंद झाली होती.

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ( Maximum number of corona patients in Mumbai )

तर मंगळवारी (11 एप्रिल) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, फक्त कोरोनाचे 242 नवे रुग्ण आढळले आहेत. तर नागपुरात 105, पुण्यात 58 आणि नवी मुंबईत 57 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे, राज्यातील एकमेव मृत्यूची नोंद अकोला जिल्ह्यात झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC) सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसचं मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती (Mask Compulsory) करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय ( Need to be vigilant due to Corona outbreak: Union Health Minister Mansukh Mandaviya )

तर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. याचप्रमाणे कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा देखील घेतला. मनसुख मांडविय म्हणाले की, ” सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच सतर्क राहण्याची आवश्यकता देखील आहे. लोकांमध्ये अनावश्यकपणे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी त्यावेळी म्हटल. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना देखील दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button