Sharad Pawar | मुंबई : आज दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अनेक विषयांवर आपलं मत स्पष्ट केलं. यामध्ये अदानी प्रकरणात जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस- काडतूस आणि राज्यातील सत्तासंघर्षातील मुद्द्यांवर रोखठोक भुमिका सांगितलं. सत्तासंघर्षाबद्दल प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही. त्यांनी सरकाऱ्यांना विचारात घेणं अपेक्षित होतं. असं ठाम मत त्यांनी मुलाखती दरम्यान मांडली.
‘चर्चा न करता निर्णय घेतला तर त्याचे दुष्परिणाम होत असतात’
तसंच पुढे शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपद दोन्ही पदे मविआ म्हणजे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संख्येच्या वरुन तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षाचा सहभाग होता. त्या संबंधित दुसरा निर्णय जर कोणी घेत असेल, राजीनामा देत असेल, त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेतला तर त्याचे दुष्परिणाम होत असतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही. असं देखील त्यांनी म्हटलं.
अदानी प्रकरणावर पवारांचा वेगळा सूर-
दरम्यान अदानी प्रकरणात जेपीसीसंदर्भात शरद पवार यांचे सूर बदलल्याचे दिसून आले. अदानी प्रकरणाची पाठराखण करणारे पवारांना याबाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर मी विरोध करणार नाही, पण मित्राचं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे. तरीही आम्हाला यात ऐक्य ठेवायचं आहे. माझं मत मी मांडलं. पण सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिले, तर मी त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांची पक्षाच्या एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही.
तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात फडतूस शब्दावरुन जोरदार शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सामना पाहायला मिळाला. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरुन शरद पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले. कोणीही एकमेकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे खडेबोल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. तसंच गेल्या अनेक वर्षांपासून “मला जो महाराष्ट्र माहित आहे, जी संस्कृती माहित आहे, यामुळे अशा शब्दांचा वापर टाका. असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- Cochin Shipyard | कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या तेलंगणा दौऱ्यावरून राजकीय चर्चांना उधाण!
- Uddhav Thackeray – चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा
- Bank Job | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर