Uddhav Thackeray – चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Uddhav Thackeray  – बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला. जे काही मिंधे सत्तेसाठी लाचार होऊन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तसेच आता हे कोणाला जोडे मारहाण किंवा स्वतःच जोड्याने आपलं तोंड फोडून घेणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे.

भारतीय जनता पक्षाची कीव येते की, एका बाजूला मोहन भागवत मशिदीत गेले होते. दुसरीकडे बाबरी पाडल्याचेही म्हणतात. यांचे हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? भाजपने हे स्पष्ट करावे. भाजपकडे कधीही शौर्य नव्हते. बाबरी पाडली तेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती. तेव्हा मुंबई शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी वाचवली. गुजरात अहमदाबादमध्ये जे घडलं त्यात पोलिसांचा वापर केला गेला. मुंबई पोलीस आणि लष्कर शिवसैनिकांना मारत होते. काही दर्ग्यांचे रक्षणसुद्धा शिवसैनिकांनी केले आहे.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे

  •  मी अयोध्येला गेलो असताना, राम जन्मभूमीसाठी विशेष कायदा करा, असे म्हटले होते. मात्र मोदींनी ते धाडस केले नाही.
  •  राम मंदिराचा निकाल कोर्टाने दिला आणि हे बिळातंन बाहेर आलेले उंदीर हे त्याचे श्रेय घेण्यास पाहताहेत. एकूणच भारतीय जनता पक्षाची कीव करण्यासारखी गोष्ट आहे.
  •  लोकांनी विचार करायला हवा. अशा भरकटलेल्या लोकांच्या हाताममध्ये आपला देश, आपलं भविष्य किती दिवस ठेवायचा.
  •  मिंध्यानी कल्याणमध्ये जे नाटक केलं होत, भाजप शिवसैनिकांवर अन्याय करतो आहे, ते मला बघवलं जात नाहीय. म्हणून मी राजीनामा देतोय. पण भाजप जो बाळासाहेबांचा अपमान करतोय त्यांच्यासोबत तुम्ही किती दिवस त्यांचे तळवे चाटत राहणार आहेत, हे सांगा. नंतर मग त्यांचे नाव आणि फोटो लावा!
  • शिवसेना हा पवित्र शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही. ते कोणाला जोडे मारणार आहेत, की स्वतःच स्वतःचे थोबाड फोडणार आहेत.
  • भारतीय जनता पक्ष म्हणजे भरकटलेला जनता पक्ष!
  • बाबरी पाडल्यानंतर त्याची जबाबदारी न घेता पळून जाणाऱ्या भाजपला उद्देशून त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, हे कसलं नपुंसक नेतृत्व? घटना घडल्यानंतर पळून जायचं, असं नेतृत्व लाभलं तर या देशात कधी हिंदु उभाच राहणार नाही.
  •  मोगलांचा इतिहास पुसता पुसता हिंदूंचा इतिहासही पुसायला निघाले की काय? ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांच्यावर ‘चौर्य’ करण्याची वेळ येते.
  • बाबरी पाडल्यानंतर सुद्धा ज्या दंगली झाल्या त्यावेळी शिवसेना सत्तेवर नव्हती. पण मुंबई वाचवली ती शिवसेनेने!
  •  तो लढा होता तो देशद्रोह्यांविरोधी होता. शिवसैनिकांनी दर्ग्याचंही रक्षण केलं आहे.
  • बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिंध्याना शोभत नाही.
  • भाजप हळू हळू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे महत्त्व लोकांच्या मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
  • सहन ही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी भारतीय जनता पक्षाची अवस्था झाली आहे.
  •  भाजपचं गोमूत्रधारी हिंदुत्व देशाच्या काही कामाचं नाही.
  •  हिंदुत्वाच्या बुरख्याआड भाजपचा जो हिडीस चेहरा आहे. तो लोकांच्या समोर येऊ द्या.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

“६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का?”

महत्वाच्या बातम्या