Face Care | उन्हाळ्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी

Face Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कारण या वातावरणात उन्हामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी बहुतांश लोक रात्री झोपताना चेहऱ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम आणि सिरम लावतात. मात्र, सतत या गोष्टींचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी खालील गोष्टींचा वापर करू शकतात.

बदाम तेल (Almond oil For Face Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्याला मसाज करू शकतात. बदाम तेलामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला पोषण प्रदान करतात. बदाम तेल त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करू शकते. त्याचबरोबर बदाम तेलाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात.

दही (Curd For Face Care)

दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर दही आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकते. दह्यामध्ये आढळणारे कॅल्शियम आणि विटामिन डी त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला दही लावून दहा ते पंधरा मिनिटे मसाज करावी लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित असे केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

कोरफड (Aloevera For Face Care)

कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला कोरफड लावू शकतात. उन्हाळ्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला कोरफड लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला वरील गोष्टी लावू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

गुलाब जल आणि आवळा (Rose water & Amla For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी गुलाब जल आणि आवळा पावडर उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे आवळा पावडरमध्ये चार ते पाच थेंब गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण अर्धा तास केसांवर लावून ठेवावी लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.

आवळा पेस्ट (Amla paste For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळ्याची पेस्ट वापरू शकतात. यासाठी तुम्हाला एक ते दोन आवळे घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटे केसांना लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एक वेळा या पेस्टचा वापर केल्याने तुमचे केस निरोगी राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या